वरणगाव( प्रतिनीधी )-
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंन्शन येथील सेन्ट्रल बँकेत आहे कर्मचाऱ्यांची पेन्शन मिळणार असल्याने त्यांची मोठया प्रमाणात गर्दि झाली होती मात्र कोरोना संसर्गाची भीती असल्याने शासन निर्णया नुसार सोशियल डिस्टसींग महत्वाचे असतांना बॅंक प्रशासनाचे ग्राहकांविषयी गांभिर्य दिसुन येत नसुन वृद्धांच्या जिवीतांशी प्रशासन खेळ करीत असल्याची शहरात चर्चा आहे
-सुरवातीच्या काळापासून शहरात राष्ट्रीयकृत एकमेव सेन्ट्रल बँक असल्याने परीसरातील केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन याच बँकेत आहेत महिन्याच्या पहिल्या आठवडयात ग्राहकांना पेन्शन मिळणे अपेक्षीत असते त्याच दृष्टीने ग्राहकांनी आपआपली पेन्शन घेण्यासाठि बँकेत जमा झाले होते मात्र बँक प्रशासनाला ग्राहकांविषयी कोणतेच गांभिर्य नसल्याचे दिसुन आले गर्दि होणाऱ्या ठिकाणी सोशियल डिस्टन्स राखणे व त्यासाठि प्रती व्यक्ती करीता १ मीटर अंतर ठेऊन गोल राऊंड किंवा सफेद कलरने बॉक्स तयार करून त्यात व्यक्ती उभी करणे अपेक्षीत आहे मात्र येथील सेंन्ट्रल बँक प्रशासनाला ग्राहकां विषयी गांभिर्य नसुन बँक आवारात ग्राहकांची सुरक्षा धोक्यात दिसुन आली.
बॅक प्रशासन विभागाने टोकन
पद्धत वापरावी – संदिपकुमार बोरसे
बॅक प्रशासन विभागाने दर तासाला ग्राहक क्षमता तपासुन टोकन पद्धत वापरावी जेणेकरून ग्राहकांना व बँक कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही आणि सुरक्षेचा प्रश्न देखील मिटेल. असे आवाहन
वरणगावचे सहाय्यक पोलिस निरक्षक संदिपकुमार बोरसे यांनी केले आहे .



