शिवशक्ती हुडको कॉलोनीसह परिसरात घाणीचे साम्राज्य ; कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तरी स्वच्छता करावी ; रहीवाश्यांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचे थैमान यामुळे सर्वत्र नागरिक भयभीत झाले आहे .स्वच्छतेच्या बाबतीत जागृक झाले आहेत मात्र अजूनही भुसावळ शहरातील बहुतांशी भाग स्वच्छतेच्या बाबतीत वंचित असून संबंधित दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील रहिवासी यांनी केला असून पालिकेने लवकरात लवकर य्या भागात स्वच्छता करावी व परिसर निरजंतुक करावा अशी मागणी केली आहे .
येथिल जामनेर रोड लगत असलेल्या हुडको कॉलोनी परिसराला घाणीने वेढलेले आहे. कॉलोनीच्या एका बाजूने इंदीरा नगरची वस्ती तर एकीकडून हायवे आहे जवळपास २७ वर्षापासून या कॉलनीत नागरिकांचा रहिवास आहे. इंदीरा नगर वस्ती व हुडको कॉलनी यात ओपन स्पेस आहे. तो सरळ हायवे पर्यत या वस्तीतील लोक या जागेचा वापर कचरा ,शेण टाकण्यासाठी व शौचास बसण्यासाठी करतात. या घाणीचा त्रास हुडकोवासी सत्तावीस वर्षापासून सहन करीत आहेत कॉलोनी रहिवासी नागरिकांनी वेळोवेळी या परिसराच्या स्वच्छतेची मागणी निवडूण येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे केली. त्या लोकांना शौचालय बांधून देवून कचरा संकलनासाठी कचरा कुड्यां ठेवाव्यात अश्याही सुचना नगरसेवकांना दिल्या, परंतु अजून पर्यत एकाही नगरसेवकाने या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही .त्यामुळे अजूनही हुडको कॉलनी वासियांना या घाणीच्या विळख्यात रहावे लागत आहे. या घाणीमुळे खुप दुर्गधीं पसरली असून व माश्यां, डास, यांचा खुप प्रादुर्भाव असल्यामुळे रोगराई पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कॉलनीत इतक्या वर्षात एक रस्ताही झालेला नाही प्रभाग २१ मध्ये हुडको कॉलनी येते यात अ आणि ब असे भागातून दोन नगर सेवक निवडूण आलेत यापैकी एक महिला राखिव जागा असल्याने महिला नगरसेवक आहे या हुडको वासियांचे दुर्भाग्य की त्यांनी या चार वर्षात यांचे दर्शन केलेले नाही त्यामुळे व्यथा मांडणार कोणाकडे दोन नगरसेवक असूनही ही कॉलोनी सर्व सुविधांपासून वंचितच आहे. म्हणून नगरपालिकेकडे संपर्क केला तर त्यांनी स्वच्छतेसाठी माणसे पाठवतो असे आश्वासन दिले परंतु अजून स्वच्छता झालेली नाही संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान आहे त्याचा प्रसार होवू नये म्हणून सर्वत्र स्वच्छता होत आहे परंतु भुसावळ मध्ये स्वच्छतेचे बारा वाजलेले आहेत कुठे रस्त्यांवर कचऱ्यांचे ठिग ,तुडूंब भरलेल्या गटारी अस्वच्छ पाणि मोठमोठे खड्डे पडलेले रस्ते या सर्व समस्यांचा सामना भुसावळकर करीत आहेत या समस्यां लवकरात लवकर दूर कराव्यात आणि नंतरच सर्व करांची मागणी पालिकेने करावी अशी मागणी सर्वच नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *