डांभूर्णी खुनातील आरोपी यावल पोलिसांच्या जाळ्यात ;आरोपीला नेणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर ममुराबाद नजीक दगडफेक;

यावल (प्रतिनिधी )-
तालुक्यातील डांभूर्णी येथील दहावीत शिकणार्‍या कैलास चंद्रकांत कोळी (१६) या विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी यश चंद्रकांत पाटील (२६) या आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी पसार झाला होता. दरम्यान आरोपी जंगलात लपून असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली यावरुन शनिवारी सकाळी त्यास अटक करण्यात आली मात्र याची माहिती संतप्त ग्रामस्थांना मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनातून आरोपीला ममुराबादमार्गे जळगावला जात असताना संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली .
डांभूर्णी शेत शिवारातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात कैलास कोळी (१६ ) या तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. आरोपीने मयताच्या डोक्यावर जोरदार वस्तूने प्रहार करून तर डोळ्यात काड्या खुपसुन मारल्याचा प्रकार उघडकिस आला होता. यानंतर आरोपी पसार झाला होता. आरोपी जंगलात लपून असल्याची माहिती यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह सुनील तायडे, विकास सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *