आयुध निर्माणी परीसरात सेनेटाईझर स्प्रे फवारणी

भुसावळ ( प्रतिनिधी )-
येथिल आयुध निर्माणी येथे कामगार युनियनच्या कार्य कारणीच्या पुढाकाराने कोरोना विषाणूचा प्रतिबंधक उपाय म्हणून आयुध निर्माणी परीसरात सेनेटाईझर स्प्रे फवारणी करण्यात आली. यात कंडारी ग्रामपंचायत सरपंच सौ. शिंगारे, पी. टी. झोपे (ग्रामसेवक), ऑ. फॅ. कामगार युनियनचे संयुक्त सचिव प्रविण मोरे, हिरालाल पारिसकर आणि येथील आरोग्य विभाग यांचे सहयोगाने आज आयुध निर्माणी सुभाष नगर परिसरात स्वच्छता विषयक सेनेटाईझर स्प्रेद्वारे फवारणीला सुरवात करण्यात आली. पुढील दोन दिवसात संपूर्ण आयुध निर्माणी परिसरात स्वछता फवारणी करण्यात येईल. सर्व वसाहत कर्मचार्‍यांना फवारणी संदर्भात सुचना दिल्या असुन सहकार्य करण्याचे अपील करण्यात आले आहे. या वेळी कामगार यूनियनचे उपाध्यक्ष मिलेश देवराले, नितीन शिवरामे, युनियन पदाधिकारी, कार्य समिती सदस्य, तसेच भुसावळ कंडारी ग्रामपंचायतीचे भारत सैदाने, मुकुंदा सपकाळे, ग्रा.पं. कर्मचारी हरी महाजन, आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांनी फवारणीचे काम पाहिले. सुरक्षित जीवनासाठी जनजागृती करीत सर्वांना घरात राहून, सरकारी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन ऑ. फॅ. कामगार युनियनद्वारे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *