भुसावळात प्रभाग १८ मध्ये नितिन धांडे यांनी स्वखर्चाने केली फवारणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहे. तसेच स्थानिक प्रभागातील नगरसेवकही आपापल्या परीने प्रभागातील नागरीकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. याच अनुषंगाने आज रविवार रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १८ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितिन धांडे व नगरसेविका सौ धांडे, यांनी स्वखर्चाने आपल्या प्रभागातील नागरीकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने औषधयुक्त फवारणी करून परिसर निर्जनंतुक केला .
प्रभाग १८ मधील गंगाराम प्लॉट, कोलते गल्ली, गौतम नगर, भवानी पेठ, याभागात नितिन धांडे यांनी आज स्वखर्चाने फवारणी करुन नागरिकांना दिलासा दिला आहे तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या नियमांचे पालन करा, घराबाहेर निघू नका .असे आवाहन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *