भुसावळ (प्रतिनिधी)-
शहरातील नॅशनल हायवे क्रमांक सहा वरील हॉटेल गॅलक्सी मध्ये जापान व बैंगलोर येथील वास्तव्यास असलेल्या दोघा विदेशी पर्यटकांची दिनांक 22 मार्च रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस स्टेशन निरीक्षक दिलीप भागवत यांनी कसून चौकशी केली असून हॉटेल मालका विरुद्ध नोटिस बजावली आहे .
भारतात मध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता फार मोठ्या शिकस्त पोलिसांसह लढवित आहे याकरीता सर्व दुकाने हॉटेल आदीसह बाजारपेठ बंद चे आवाहन सरकारने दिले आहे तसेच आज सुद्धा 22 रोजीचा जनता कर्फ्यु मध्ये पालन करण्याची सूचना वजा आदेश दिले आहे असे असतांना देखील हॉटेल गैलक्सी सुरु असून तेथे
एक मुलगा व मुलगी रहिवास करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळताच त्वरित घटनास्थळी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन धडकले . या दोघां विदेशी पर्यटकांची चौकशी केली.दरम्यान हॉटेल मालकाने माहिती लपविली म्हणून देण्यात येवून नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.तसेच पो नि भागवत यांनी त्वरीत डॉक्टरांच्या टीमला तपासणीसाठी हॉटेलला येण्यास सांगितले.
जनता कर्फ्यूला भुसावळात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले . .



