भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता या पार्श्वभूमिवर
पंतप्रधान मोदी यांच्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला भुसावळकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे . सकाळी ७ वाजेपासुन ते दुपारी १२ वाजे पर्यन्त ची भुसावळ शहराची ही परिस्थिती होती .अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील जामनेर रोड , यावल रोड , खडका चौफुली, सराफ बाजार , बाजारपेठ , सातारा ब्रिज आदीं तसेच सर्वत्र
नेहमी अहोरात्र गजबज असलेल्या भुसावळ जंक्शन रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडया रद्दचा व जनता कर्फ्युचा चांगलाच परिणाम बघावयास मिळाला प्रचंड शुकशुकाट एकही गाडी
व प्रवासी स्थानकावर नव्हते .सर्वत्र नीरव शांतता दिसून आली .
गजबज असलेले शहरातील मुख्य रस्त्ये निर्मनुष्य होते एकही गाडी दिसत नव्हती.भयंकर महामारीच्या काळात लोकांनी घरात बसणे अधिक पसंद केले आहे .
आज रविवार शहराचा आठवडे बाजार होता मुख्य बाजारपेठ व बाजार बंद ठेवून जनता कर्फ्युला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला . भुसावळच्या पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांचे सह पालिका विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक सकाळ पासूनच शहरात लक्ष ठेवून होते . गजबजलेल्यां या भागात व परिसरात आज मात्र पूर्णत: शुकशुकाट पसरला होता .
बसफेऱ्या आज बंद
भुसावळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जनता कर्फ्यु लागू
केला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून रविवारी सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या . भुसावळ बसस्थानकातून एकही बस रविवारी धावली नाही. मात्र, प्रवाशांनी एकत्रितपणे मागणी केल्यास त्यांच्यासाठी खास बसची व्यवस्था केली जाणार असल्याचे आगार प्रमुख पी.बी.भोई यांनी सांगितले . विणाकारण कोणीही घराबाहेर निघून टार्गटपणा करणाऱ्या युवकांवर पोलिसांनी चांगलीच नजर ठेवली आहे .





