चोपड़ा शहरासह तालुक्यात कडकडीत बंद ; जनता कर्फ़्यूला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सर्वत्र शुकशुकाट

चोपड़ा (प्रतिनिधि) —– कोरोना वायरसच्या पार्श्वभूमिवर 22 मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांनी जनता कर्फ्यू लागू करण्याचा जो निर्णय घेतला त्यास भारत देशाचा एक सुजान नागरिक म्हणून चोपडयातिल जनतेने एक दिवस स्वताच्या आरोग्यसाठी व देशासाठी बाहेर न पडन्याचा निर्णयास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे
शहरातील नेहमी गर्दी असणारे चौक व ठिकाणे आज अक्षरशः ओस पडले होते सर्वत्र परिसर निर्मानुष्य होता सर्व दुकाने बंद होती त्यात होटल्स , ढाबे , रिसोर्ट , फार्म हाउस , रेस्टॉरेन्ट , खानावडी , लॉजिंग , आइसक्रीम पार्लर , सर्व प्रकारची शितपेयांची दुकाने व गाड्या , त्यात लिम्बु / सोडा सरबत , बर्फाचे गोले , आइस कैंडी , उसचा रस , सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ , सर्व प्रकारची सोने चांदीची दुकाने , कापड़ दुकाने , औटोमोबिल , भांडयाची दुकाने , इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल , टिम्बर , हार्डवेयर , प्लायवुड , जेरॉक्स , फ़ोटो स्टूडियो , लॉटरी सेंटर , बुक स्टॉल , मोबाइल शॉप्स , सलून , ब्यूटी पार्लर , फटाके , गैरेज , स्वीट पदार्थ , सायबर कैफ़े याशिवाय सर्व लहान मोठे दुकाने 100 % बंद होती
तसेच शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आम्बेडकर चौक , राणी लक्ष्मीबाई चौक, चावड़ी चौक , गोल मंदिर चौक , आशा टॉकीज चौक , थालनेर दरवाजा चौक याशिवाय संपूर्ण शहर शांततासह निर्मानुष्य होते
जनता कर्फ्यू साठी विनायक लोकरे ( पी आय चोपड़ा शहर ) , संदीप आराक ( पी आय चोपड़ा ग्रामीण ) , अविनाश गागोडे ( मुख्याधिकारी न पा चोपड़ा) , डॉ मनोज पाटील ( वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय ) , संदेश क्षीरसागर (आगार प्रमुख) यासह पदाधिकारी , कर्मचारी व जागरूक जनतेने परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *