आपल्या कामाची वा घरातील जागा निर्जंतुक करण्याकरीता घरीच तयार करा सोल्यूशन – डॉ . कीर्ती फलटणकर

कोरोना आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी आपल्या कामाची जागा निर्जंतुक करण्यासाठी १ टक्के सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशन २० एमएल 1 लिटर पाण्यात मिसळून
(1%sodium hypochloride solution ) चा वापर करा .१ टक्के सोडियम हायपोक्लोराइड सोल्यूशन उपलब्ध नसल्यास रिकामी आगपेटी भरून ब्लिचिंग पावडर घेवून ते एक लिटर पाण्यात मिसळावे व ते एका बाटलीत भरून घ्यावे तसेच हे पाणी सुद्धा २० एमएल द्रव्य घेवून एक लीटर पाण्यात घेवून वापरावे .
या सोल्यूशनने घरातील वा कार्यालयातील टेबल,खुर्ची ,आपल्या घरातील फरशी टेबल-खुर्ची लॅपटॉप फोन सर्व फर्निचर, फरशी पुसून कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबविण्याकरीता निश्चितच मदत होईल अशी माहिती नगरपरिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ . कीर्ती फलटणकर यांनी प्रत्यक्षिकासह दिली .
यावेळी रुग्णालयातील स्टॉफ उपस्थित होते .

प्रत्यक्षिका करीता बघा vdo

https://youtu.be/lp4mAmN5QHE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *