प्रदीप भोळे यांनी वाटप केले पंचवीसशे मास्क जनजागृती होण्यासाठी सोबत दिले माहितीपत्रके

वरणगाव (प्रतिनिधी) –
येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप भोळे यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 25 शे मास्क चे वाटप करत जनजागृतीसाठी माहितीपत्रके देखील देण्यात आली
माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप निवृत्ती भोळे यांनी देशभरात सुरू असलेल्या व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रभागांमध्ये फिरून माहितीपत्रके दिली तसेच या आजाराची लक्षणे व टाळण्यासाठीचे उपाय योजना सांगत शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने घरामध्ये रहा काम असेल तरच बाहेर पडा बाहेर पडताना तोंडावरती मास्क लावा वारंवार हात धुवा विनाकारण इतरांना भेटू नका तसेच रविवारी जनता कर्फ्यू ला साथ द्या व मानव जाती वरती आलेले संकट टाळा असे आवाहन करत बाहेर निघताना तोंडाला मास्क लावण्यासाठी मोफत वाटप करण्यात आले तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींची माहिती ग्रामीण रुग्णालय परत द्या त्यांच्या चाचण्या करून देण्याचे आव्हान देखील यावेळी करण्यात आले त्यांच्यासोबत उमेश बोंडे मयुर चौधरी विलास भोगे कैलास झोपे सचिन भोळे प्रकाश चौधरी सुनील शिवरामे श्रीराम सनांसे गणेश बोंडे कृष्णा माळी प्रदीप बढे राहुल पाटील विनील बराटे प्रवीण कावळे सोपान झोपे आदी होते
शहरांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होत आहे परंतु ग्रामीण भागात त्याचे गांभीर्य समजले पाहिजे व त्याबाबतची जनजागृती झाली पाहिजे जेणेकरून या आजाराचा विषाणू ग्रामीण भागात येण्यापासून प्रतिबंध घालता यावा यासाठी मोफत मास्क व जनजागृती केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *