भुसावळ पालिकेचा नागरिकांच्या जिवाशी खेळ ; घरोघरी नळावाटे होतोय दुर्गंधीयुक्त गढुळ हिरव्या पाण्याचा सप्लाय ;

भुसावळ – राज्यासह संपूर्ण देशात कोरोना व्हायरस (कोविड १९) चे संकट समोर उभे आहे . याकरीता केंद्र व राज्य शासन अहोरात्र युद्धजन्य परिस्थितिचा सामना करीत आहे . वारंवार स्वच्छते बाबत सूचना देत आहे काळजी घ्या घरात थांबा ,बहुतांशी भुसावळकर सुद्धा या नियमांचे पालन करीत आहे मात्र ज्यांच्या हातात भुसावळ करांच्या आरोग्याच्या काळजीची धुरा दिली त्या पालिका प्रशासनास याचा विसर पडला की काय ? असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला असून हया निष्ककाळजीपणामुळे नागरिकांचे आरोग्य घरबसल्या चांगलेच धोक्यात आले आहे .कोरोना मुळे नंतर मरु पण पालिकेने मारण्याचा मार्ग मोकळा केला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी व्यक्त केल्या .
शहरातील विविध भागात सकाळ दुपार व संध्याकाळ अश्या सत्रात आठवडयातून एक वेळेस पाणी पुरवठा होत असतो. तर कधी कधी अधूनमधून पाईप लाईन फुटल्याने अनियमित होणारा पाणी पुरवठा हा तब्बल 12 ते 15 दिवसांनंतर होतो यामुळे सुद्धा साठा केलेले पाण्याला सुद्धा दुर्गंधी येवू लागते लोक पाणी पिवू शकत नाही . अशी सद्यस्थिती भुसावळ शहरवासियांची आहे . मार्च महिन्यात उन्हाळ्याची सुरवात असते यंदा अवकाळी व कोरोना अश्या नैसर्गिक आपत्तीला नागरिक सामोरे जात आहे .
आज झालेला पाणी पुरवठा कोणत्याही प्रकारे शुद्धिकरण (फिल्टर ) न करता डायरेक्ट करण्यात आला आहे या गंभीर बाबीकडे पालिकेच्या
मुख्याधिकारी , नगराध्यक्ष , यांचेसह सबंधितांनी त्वरित लक्ष देवून शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *