भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना (कोव्हीड १९ )चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भुसावळ पालिकेने पाऊल उचलले असून
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांनी पानटपरी व दुकाने २१ ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी सौ कल्पना डहाळे यांनी आज शनिवार २१ मार्च रोजी पारित केले आहे .
रस्त्यावर थूंकणाऱ्यां विरुद्ध सुद्धा होणार कारवाई ;
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन , जळगाव, यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा. 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावली मधील तरतुदीनुसार, तसेच महाराष्ट्र
पोलिस कायदा, 1951 चे कलम 43 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मोठ्या प्रमाणात लोकांचा समुह
एकत्र जमण्यासाठी व कोरोना (कोव्होड १९) चा संसर्ग व प्रसार रोखण्यासाठी वेळोवेळी आदेश निर्गमीत केलेले
आहेत. जिल्हाधिकारी यांचे आदेशांनव्ये
मुख्याधिकारी नगरपरिषद यांना त्यांचे कार्यक्षेत्रात या सर्व गोष्टीना प्रतिबंध करण्यासाठी प्राधिकृत करुन तसे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.’
त्यानुसार भुसावळ नगरपरिषद या क्षेत्रासाठी मुख्याधिकारी यांनी पालिका हद्दीत ते सर्व पदार्थ जे खाउन चाऊन थुकले जातात ऊदा. सर्व खाउची पाने,तंबाखूजन्य पदार्थ, मावा,सुगंधी सुपारी व इतर तत्सम पदार्थ यांनी धुंकीतून करोना (कोव्हीड १९) चा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याची खात्री असल्याने कोरोना (कोव्हीड १९) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना व दक्षता याचा एक भाग म्हणून सर्व खाण्याची पाने, तंबाखूजन्य पदार्थ, मावा,सुगंधी सुपारी व इतर तत्सम पदार्थ विक्री करनारे दुकाने,रस्त्यावरील विक्रेते व पानटप-यायांना दिनांक २१ ते ३१ मार्च २०२० पर्यत बंदी लागू करण्यात आली आहे.
तसेच जिल्हाधिकारी यांनी प्रदान केलेल्या प्राधिकरणानुसार या आदेशाचे उल्लंघन करुन ते सर्व पदार्थ जे खाउन चाऊन थुकले जातात ऊदा. सर्व खाण्याची पाने,तंबाखूजन्य पदार्थ, मावा,सुगंधी सुपारी व इतर तत्सम पदार्थ यांची विक्री करताना कोणी आढळल्यास त्याचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ अन्वये
तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये तसेच भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८
नुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी यांनी कळविले आहे .



