भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील सुसरी शिवारात किरण पप्पू पावरा (वय ५) या बालिकेच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला साप चावल्याने वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यापूर्वीच या मूलीचा मृत्यू झाला. वरणगाव येथील रहिवासी कृणाल प्रभाकर झोपे यांच्या सुसरी शिवारातील शेतात पप्पू पावरा हे कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी किरणला शुक्रवारी सकाळी 11 वाजता साप चावल्याची घटना घडली . वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यापूर्वीच या मूलीचा मृत्यू झाला.
हवालदार संदीप बडगे पुढील तपास करत आहेत.



