भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होण्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे , हा कर्फ्यु नागरिकांनी सुद्धा स्वयंस्फुर्तिने व काटेकोरपणे पाळावा असे आवाहन भुसावळ पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ . कीर्ती फलटणकर यांनी केले आहे .
रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्व लोक खरेदीसाठी वगैरे बाहेर पडतात तरी कुणीही घरातून बाहेर पडू नये हा कर्फ्यु पूर्णपणे पाळावा व या कोरोना व्हायरसला भारतातून हद्दपार करायला मदत करावी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा जो निर्णय घेतला आहे तो लोकहितार्थ घेतलेला एक चांगला निर्णय आहे या निर्णयाचे स्वागत करते असे मत भुसावळ नगरपरिषदेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ कीर्ती फलटणकर यांनी व्यक्त केले आहे .
रविवारचा कर्फ्यू नागरिकांनी काटेकोरपणे पाळावा -निर्णयाचे स्वागत – डॉ . कीर्ती फलटणकर

