भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ न्यायालया मध्ये प्रैक्टिस करतांना करीत असताना अनेक केसेस महिलांवर होणारे अन्याय व अत्याचाराच्या असल्याचे पाहिले .या महिलांची अवस्था पाहता अश्या केसेस त्वरित चालवून पीडितेला लागलीच योग्य निर्णय द्यावा . निर्भया प्रकरणात 4 आरोपीना फाशीची शिक्षा झाल्याने आज महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे ही उत्साहाची व विजयाची गोष्ट आहे मात्र हा न्याय मिळाला तो खूप उशिरा मिळाला ही खंत वाटते परंतु न्याय मिळाला यातच सर्व नारी शक्तिचा विजय झाल्याचेही मत अॕड. कल्पना टेमाणी यांनी व्यक्त केले .
निर्भयाच्या आत्म्याला शांती मिळाली आहे व निर्भयाच्या आईला पण आज न्याय मिळाला आहे हे मी महिला असल्याने समजू शकते , जे देशांमध्ये जगामध्ये महिलांवर अत्याचार होतात त्यांना शक्यतो न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे असेही मत अँड. कल्पना टेमाणी यांनी व्यक्त केले

