भुसावळ (प्रतिनिधी )
रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी रेल्वेतर्फे जेष्ठ नागरिक, पत्रकार, परितक्ता, स्वातंत्र्य सैनिक या प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलती २० मार्च पासून रद्द करण्याचा निर्णय घेतला असून दिव्यांग ,अपंग व रुग्ण यांच्या सवलती मात्र सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतले आहे .
२०.०३.२०२० पासून अनारक्षित व राखीव तिकिटांवरील सवलत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
अपंग सवलत, मानसिक अपंग सवलत, दृष्टि हिन , मूक बहिरे यासारख्या प्रवाश्यांना काही सवलती देण्यात येईल. यामध्ये दिव्यांग सवलत, मानसिकरुप विकलांग सवलत , दृष्टिहीन सवलत, मूक व बधीर सवलत, कर्करोग ग्रस्त सवलत, थालेसिमिनाया , टीबी सवलत, क्षयरोगी सवलत , विद्यार्थी सवलत, आणि सर्व रुग्णाना मिळणाऱ्या सवलती सुरु राहतील . या सर्व सवलती वगळता पुढील ऑर्डर होईपर्यंत अन्य सवलती रद्द करण्यात आल्या आहे.



