तालुक्यातिल किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील छताचे प्लॅस्टर अचानक कोसळले ; सुदैवाने एक रुग्ण बालबाल बचावला

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील किन्ही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कक्षातील छताचे प्लॅस्टर अचानक कोसळल्याची घटना दि.१९ रोजी सकाळी १०.३०वाजेच्या सुमारास घडली. यात एक रुग्ण बालंबाल बचावला. यामुळे रुग्णांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील चार पैकी तीन बेडवर रुग्णांवर उपचार सुरु होते. सुदैवाने यातील एका बेडवरील रुग्ण उठताच छताचे प्लॅस्टर अचानक बेडवर कोसळ्याने रुग्ण बालंबाल बचावला. या घटनेमुळे इतर रुग्णांची ही धावपळ सुरु झाली. दरम्यान रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांनी दवाखान्यात गर्दी केली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नसल्याने ग्रामस्थ व रुग्णांनी सुटकेचा श्‍वास घेतला. यानंरत सायंकाळ पर्यंत या केंद्रात शुकशुकाट होता.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी या जीर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम नुकतेच एका खाजगी ठेकेदाराकडून करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *