भुसावळ (प्रतिनिधी ) –
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गाचे १ मार्च रोजी पुर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी चाळीसगाव-धुळे हा ५७ कि.मी. मार्ग १ मार्च रोजी सुरू करण्यात आला आहे. पूर्वी या मार्गावर डिझेल इंजीनने गाड्या चालविल्या जात होत्या. त्यामुळे डिझेल जास्त लागून पर्यावरणावरही त्याचा परिणाम व्हायचा. परंतु आता या विभागाच्या विद्युतीकरणामुळे वेळ आणि इंधनही वाचणार आहे.या विद्युतीकरणामुळे आता भुसावळ विभागातील सर्व विभागातील १०० टक्के विद्युतीकरण करण्यात आले आहे. आता विद्युतीकरणाच्या बाबतीत भुसावळ विभाग मध्य रेल्वेत तिसर्या स्थानावर आहे.



