भुसावळ येथील मुद्रा योजना तालुकास्तरीय मेळाव्याच्या ठिकाणात बदल

जळगाव – जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, लघु उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे. याकरिता जिल्हास्तरीय मुद्रा योजना प्रचार व समन्वय समितीच्यावतीने जळगाव जिल्ह्यात तालुकानिहाय प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे

यानुसार भुसावळ तालुक्याचा तालुकास्तरीय मेळावा 4 मार्च, 2020 रोजी बियाणी पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या मेळाव्याच्या ठिकाणामध्ये बदल करण्यात आला असून आता भुसावळ येथील मेळावा 4 मार्च, 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता डी. एस. हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या मेळाव्यास तालुक्यातील बेरोजगार युवकांनी, लघु उद्योजकांनी, बचत गटाच्या महिलांनी तसेच स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *