नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित भव्य माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित भव्य माजी विद्यार्थी मेळावा २०२० उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णु चौधरी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थी आमदार तथा माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार सदस्य संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक तर प्रमुख उपस्थिती डॉ. मोहनभाऊ फालक (अध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ), ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष व माजी विद्यार्थी संजयकुमार नाहाटा, नगराध्यक्ष तथा माजी विद्यार्थी रमण भोळे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ शामशेठ दरगड (माजी विद्यार्थी), अनिल भोळे (माजी विद्यार्थी), नीलकंठ भारंबे (माजी विद्यार्थी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे (माजी विद्यार्थी), उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील (माजी विद्यार्थी), उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे (माजी विद्यार्थी संघटना सल्लागार), उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी (माजी विद्यार्थी), उपप्राचार्य डॉ. एन. ई. भंगाळे, उपप्राचार्य प्रा. शैलेश पाटील (कनिष्ठ महाविद्यालय), पर्यवेक्षक प्रा. यु. बी. नंदाने (कनिष्ठ महाविद्यालय), प्रा. ई. जी. नेहेते (माजी विद्यार्थी संघटना सल्लागार), प्रा. प्रशांत व्ही. पाटील (अध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना), आशिष चौधरी (उपाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना), प्रा. डॉ. जी. आर. वाणी (सचिव माजी विद्यार्थी संघटना), प्रा. हर्षल पाटील(कोषाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना), प्रा. डॉ. गौरी एम. पाटील ( समन्वयक माजी विद्यार्थी मेळावा), मनोज बियाणी (माजी विद्यार्थी व अनमोल सहकार्य), प्रा. स्मिता बेंडाळे, प्रा. स्वाती शेळके, संतोष विनंते, राजू पारीख, किरण महाजन, यांची होती.

सुरुवातीला माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये उपस्थित माजी विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करण्यात आली. त्यामध्ये जवळ जवळ ७०० माजी विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी झाली. तसेच माजी विद्यार्थ्यांचा ओळख परिचय करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध कला प्रकार सादर करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे दर्शन सिनेगीत, डान्स, मिमिक्री तसेच इत्यादी कलाप्रकारांनी सादर केले.

यानंतर माजी विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाविद्यालयाची भ्रमंती केली व महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले तसेच महाविद्यालयातील विविध ठिकाणी जाऊन फोटो काढण्याचा देखील आनंद घेतला. याच प्रमाणे आपल्या त्यावेळेच्या गुरुंविषयी जे आता सध्या महाविद्यालयातून सेवानिवृत झालेले आहे. त्यांच्या देखील आठवणींना उजाळा दिला. असे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण दिवसभर मेळाव्याचा आनंद लुटला.
आपल्या माजी विद्यार्थीनी व माजी विद्यार्थी संघटनेच्या सल्लागार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौ. मिनाक्षी वायकोळे यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की त्यांनी ५ वर्षे याच  महाविद्यालयात शिक्षण घेतले. माजी विद्यार्थी महाविद्यालयाचे संस्थेचे असेट आहेत. आपले माजी विद्यार्थी हे विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे. अशा क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप नाव मिळविले आहे तसेच आपल्या ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे नाव उज्ज्वल करीत आहे. माजी विद्यार्थी मेळाव्याचे कारण विचारांची देवाणघेवाण होते आणि नवीन सूचना माजी विद्यार्थी देऊ शकतात. त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि खूप जास्त संखेने माजी विद्यार्थी उपस्थित राहिल्यामुळे संस्थेला खूप धन्य झाल्यासारखे वाटले असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी आपल्या  मनोगतात सांगितले की माजी विद्यार्थी संघटना प्रामुख्याने 2000 सालापासून ओळखीस आली. गेली 20 वर्षापासून प्रा. ई. जी. नेहेते ही संघटना सांभाळत आहेत. आजी विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी काय करू शकतात तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे आजी विद्यार्थांसाठी काय कार्य करता येईल, काय मदत करता येईल असे सांगितले. माजी विद्यार्थी व माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार आजच्या (कार्यक्रमाचे) मेळाव्याचे उद्घाटक आमदार संजय सावकारे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत आपल्या मनोगतात सांगितले की मी याच महाविद्यालयात सायन्स चा विद्यार्थी होतो. नाहाटा महाविद्यालय उत्तर महाराष्टामध्ये प्रसिद्ध आहे. गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक, क्रीडा साहित्य, ग्रंथालय पुस्तके ई. सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मदत करता येऊ शकते. महाविद्यालयाचे आपण ऋणी आहोत. नाहाटा महाविद्यालयाचा अभिमान आहे असे त्यांनी व्यक्त केले.   
माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील यांनी मनोगतात सांगितले की माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात सर्वांनी मिळून कार्य करावे. त्यामुळे खूप जास्तीत जास्त लाभ आजी विद्यार्थ्यांना होऊ शकेल. सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे त्यांनी स्वागत केले.
प्रा. डॉ. जी. आर. वाणी (सचिव माजी विद्यार्थी संघटना) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थ्यांमध्ये संवाद खूप महत्वाचा आहे. अशा मेळाव्यांमधून माजी विद्यार्थी जे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये असतील त्यांनी आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
या माजी विद्यार्थ्यानी केले मनोगत व्यक्त
त्यानंतर माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थ्यांमधून भुसावळ पालिकेचे नगराध्यक्ष तथा माजी विद्यार्थी रमण भोळे ,माजी विद्यार्थी जगदीश पाटील, मंदार ओक, दिनेश पाटील, रमण भोळे सर, मंजुषा निमाणी, प्राजक्ता पाटील, प्रसाद कुलकर्णी, विक्की ठाकूर, श्री. प्रवीण शर्मा, श्री. स्वप्नील सुतार, अॅड. रमेश पांडव, प्रकाश मोडक, तेजस पाटील, राजेंद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  
मेळाव्याचे अध्यक्ष तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णु चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की अशा माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे खूप चांगले कार्य होऊ शकते.
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक डॉ. गौरी पाटील यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत सरोदे, प्रा. दिपक पाटील, अंजली पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी संघटना कोषाध्यक्ष प्रा. हर्षल वि. पाटील यांनी केले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी संघटना आशिष चौधरी (उपाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना) , प्रा. डॉ. जी. आर. वाणी (सचिव माजी विद्यार्थी संघटना), प्रा. हर्षल पाटील (कोषाध्यक्ष माजी विद्यार्थी संघटना), प्रा. डॉ. गौरी एम. पाटील, अजय भोळे, प्रा. स्वाती शेळके, प्रा. स्मिता बेंडाळे, संतोष विनंते, प्रा. जय काशिव, प्रा. अजय सुरवाडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कमवा शिकवाचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *