भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे भुसावळ विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या भुसावळ बडनेरा मेमू ट्रेनचे उद्घाटन रविवार ९ फेब्रूवारी रोजी सकाळी ६.३० वाजता खा रक्षा खडसे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी खा खडसे यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला .
प्रवासी सोयीसाठी 1 फेब्रूवारी रोजी भुसावळ बडनेरा मेमू ट्रेन चालविली गेली असून या गाडीचे औपचारिक उद्घाटन रविवारी खासदार श्रीमती रक्षताई खडसे यांनी केले. यावेळी आमदार संजय सावकारे, उपाध्यक्ष रमण भोळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता , आर.के. शर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, वरिष्ठ विभागीय अभियंता व्यवस्थापन रामचंद्रन, वरिष्ठ विभागीय अभियंता लक्ष्मीनारायण, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अरुण कुमार , सहाय्यक व्यवस्थापक अजय कुमार, स्टेशन संचालक अय्यर, स्टेशन व्यवस्थापक श्रीवास्तव व सर्व कर्मचारी उपस्थित होते. मेमो ट्रेनचे लोको पायलट राम वर्मा आणि गार्ड पी. व्ही. सोनवणे होते.



