भुसावळ (प्रतिनिधी )-
गणेश वंदना, पारंपारिक महाराष्ट्राची लोकधारा, नाटिका, मराठी विषयाची गोडवे गाणारी एकांकिका, समूह गीत, स्वच्छ अभियान, संगीत, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीत, बेटी बचाव बेटी पढाव, शिक्षणाचे महत्त्व यांमधून दोनशे शिक्षकांनी आपल्या अंगी असलेले विविध गुणांचे प्रगटीकरण सेन्ट अलायसेस हायस्कूलमध्ये आयोजित स्नेह तरंग या कार्यक्रमातून केले व उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
शिक्षक विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात त्यांच्या अंगी असलेले गुण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कार्यक्रमांतून प्रगटीकरण होत असते अशा शिक्षकांचे कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे अशा प्रकारची संकल्पना गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी मांडताच तालुक्यातील सर्व संघटनांनी एकत्रित येऊन दोनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले शनिवारी क्रीडा परिषद घेण्यात आली यामध्ये क्रिकेट, धावण्याची स्पर्धा, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, यासह इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर शनिवारी दुपारी सेन्ट आलायस हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या स्नेहतरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील, केंद्रप्रमुख संजय श्रीखंडे, नलिनी झांबरे, बि डी बोदडे, आदी उपस्थित होते पाच तास सुरू असलेल्या या कार्यक्रमातून शिक्षकांनी आपल्या वयाचे भान विसरत लहानपणाच्या आठवणी जागृत करत बेभान होऊन नृत्यनाटिका एकांकिका गीत गायन गवळण गीते सादर केली अशा प्रकारचे कार्यक्रम शिक्षकांना प्रेरणा देऊन शाळांमध्ये चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले
सायंकाळी निरोप समारंभासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व मान्यवर उपस्थित होते यावेळी क्रीडा परिषदेतील विजयी संघ व खेळाडु तसेच वैयक्तिक नृत्य सांगिक नृत्य वैयक्तिक गीत गायन सामूहिक गीत गायन एकांकिका नाटिका यामधील विजयी कलावंतांचे पारितोषिक वितरण करण्यात आले
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील म्हणाले की आपल्या तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम होत असतात शिक्षकांसाठी झालेला हा महाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम असावा त्याचप्रमाणे तालुक्याची गुणवत्ता देखील चांगली आहे भविष्यात आपल्या तालुक्यात इतर जिल्ह्यातील शिक्षक भेट देतील अशा प्रकारचे उपक्रम राबवावे
तर शिक्षण सभापती रवींद्र पाटील म्हणाले की शिक्षणक्षेत्रात जिल्ह्यातील कोणत्याही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेसाठी कुंपण व मुलींसाठी स्वच्छतागृह असण्यावर माझा भर आहे तसेच आज घेतलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेऊन अशा प्रकारचे वेगळे उपक्रम राबवता येतील का याबाबत विचार केला जाईल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील व निशा पाटील यांनी तर आभार गणेश फेगडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप सोनवणे व सर्व संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले



