भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे मुख्यालयातर्फे सतर्कता सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात रेल्वे स्कूलच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवत यश मिळवले.
या सप्ताहात मध्य रेल्वेतील विविध मंडळातील कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. रेल्वे स्कूलचे शिक्षक शंकर चौहान यांनी प्रश्न मंजूषा (क्विझ) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला तर मनोज साळुंके यांनी मराठी निबंध स्पर्धेत तृतीय स्थान पटकाविले. मध्य रेल्वेचे जी.एम.संजीव मित्तल यांच्या हस्ते विजेत्यांना पारीतोषिक प्रदान करण्यात आले. यश प्राप्त करणार्या शिक्षकांचे डीआरएम विवेककुमार गुप्ता. एडीआरएम मनोज गुप्ता, सिनी.डीपीओ एन.डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.



