शिक्षकांना देण्यात आलेली दिवाळी सुट्टी कमी ; “शिक्षक वर्गात नाराजीचा सूर ; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
“शिक्षकांना देण्यात आलेली दिवाळी सुट्टी कमी असल्याने” शिक्षक वर्गात नाराजीचा सूर होता त्या संदर्भात व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व खेड्या पाड्यावरील गरीब विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षणात सामावून घेणारा संदर्भातील निवेदनांच्या पूर्तते संदर्भात निलेश भोईर- राष्ट्रीय महासचिव ग्राहक संरक्षण तथा माध्यमिक शिक्षक सेना अध्यक्ष, प्रा.विनोद हिम्मतराव गायकवाड शिक्षकसेना अध्यक्ष जळगाव जिल्हा तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्राहक संरक्षण
विकास चव्हाण-महासचिव महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक संघटना यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत शुक्रवार दि.६ नोव्हेबर रोजी
सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले.

“शिक्षकांना देण्यात आलेली दिवाळी सुट्टी कमी असल्याने शिक्षक वर्गात नाराजीचा सूर होता.शिक्षकांना कोविडच्या सर्वेक्षणासाठी कामाला जुंपलं गेलं.कितीतरी शिक्षकांचा जीव गेला.विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी शिक्षकांना कामावर शासन आदेशाप्रमाणे यावे लागत आहे.पूर्वी शिक्षकांना आलटुन-पालटून ५ टक्के उपस्थितीसह बोलावण्यात येते होतं.आता ५०टक्के उपस्थिती आहे.सातत्याने आँनलाईन तास घेणे सुरु आहे.अध्ययन अध्यापन अहवाल देणे सुरु आहे.विद्यार्थ्यांच्या पालकांना कोविड काळात धान्यवाटप करण्यात आले.सर्व शिक्षक उपस्थित होते.विद्यार्थी संपर्क कोविड काळात करण्यात आला.त्यांची परिस्थिती कशी आहे पालक विद्यार्थी यांनी खचु नये म्हणून धीर देवून प्रोत्साहित करणारे शिक्षकच होते.असं असतानाही तुम्ही किमान दिवाळी सुट्टीत तरी सण साजरा करण्यासाठी वाढीव दिवाळी सुट्टीची मागणी करण्यात आली. “शिक्षकांना देण्यात आलेली दिवाळी सुट्टी कमी असल्याने” शिक्षक वर्गात नाराजीचा सूर होता त्या संदर्भात व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व खेड्या पाड्यावरील गरीब विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षणात सामावून घेणारा संदर्भातील निवेदनांच्या पूर्तते संदर्भात निलेश भोईर- राष्ट्रीय महासचिव ग्राहक संरक्षण तथा माध्यमिक शिक्षक सेना अध्यक्ष, प्रा.विनोद हिम्मतराव गायकवाड शिक्षकसेना अध्यक्ष जळगाव जिल्हा तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्राहक संरक्षण
विकास चव्हाण-महासचिव महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक संघटना यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासोबत शुक्रवार दि.६ नोव्हेबर रोजी
सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *