भुसावळ (प्रतिनिधी )-
महामार्गावर चाकू घेवून
फिरणार्या सागर दिलीप कोळी (रा.पिंपरूड) या संशयीतास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार संदेश निकम हे सहकार्यांसोबत गस्तीवर असताना नाहाटा चौफुलीजवळ संशयित कोळी त्यांना फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला नाव विचारल्यावर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाकू आढळल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला.



