भुसावळ (प्रतिनिधी )
लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात साजरी करण्यात आली .
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला कृऊबा समिती सभापती सचिन चौधरीं यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिन चौधरीं यांचे समवेत शेतकी संघाचे चेअरमन पंढरी पाटील, विलास देवकर, गजु सरोदे, प्रशांत निकम, अशोक सरोदे, सुरेश येवले, प्रवीण पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.




