भुसावळ (प्रतिनिधी )-
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती निम्मित शहर व परिसरात ठिकठिकाणी साजरी करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
यानिमित्त येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर अध्यक्ष नितीन धांडे, तसेच लेवा यूवा शहर अध्यक्ष देवा वाणी, यांनी सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृति पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन केले .
यावेळी येथील मनीष पाचपांडे , यतीन पाटील, रुपेश बर्हाटे , गिरीश भिरुड , आदि उपस्थित होते .



