भुसावळचे माजी नगरसेवक युवराज लोणारी व निक्की बत्रा यांचा ‘कोरोना योद्धा’ पुरस्काराने सन्मान –


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना महामारीच्या काळात जनसेवेसाठी अहोरात्र धडपड करणार्‍या भाजपाचे माजी नगरसेवक युवराज लोणारी व
निक्की बत्रा यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने भाजपा पदाधिकार्‍यांनी सन्मान केला. गुरुवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात रात्री आठ वाजता भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक झाली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नगरसेवक युवराज लोणारी व निक्की बत्रा यांचा सन्मान करण्यात आला. लोणारी यांनी कोरोनाच्या काळात प्रभागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह धान्य वाटप केले होते शिवाय कोरोनाबाबत जनजागृती केली होती तसेच दोन महिने लोणारी हॉलही प्रशासनाला उपलब्ध करून दिला होता व या कार्याची दखल घेवून त्यांना गौरवण्यात आले.तर नगरसेवक बत्रा यांचा सन्मान करण्यात आला. बत्रा कोरोना महामारीच्या काळात प्रभागातील गरजूंना किराणा तसेच संसारोपयोगी वस्तूचे वाटप केले होते तसेच कोरोनाबाबत व्यापक जनजागृती केली तसेच नागरीकांसाठी आरोग्य शिबिर तसेच शासनाच्या सहकार्याने स्वॅब टेस्ट शिबिरही घेतले. या सामाजिक उपक्रमाची दखल घेवून त्यांना सन्मानीत करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणीक, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, बेटी बचावो बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सरचिटणीस विजय धांडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शैलजा शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.
व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणीक, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, बेटी बचावो बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सरचिटणीस विजय धांडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शैलजा शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *