धुळे –
रेल्वे प्रशासनच्या वतीने दिनांक २६ ऑक्टोबरला धुळे स्टेशन येथे स्टेशन परिसरा मध्ये बनविण्यात आलेले नवनिर्मित 100 फूट उंच राष्ट्रध्वजा चे लोकार्पण हे ऑनलाइन वीडियो लिंक च्या माध्यमातुन संपन्न करण्यात आले.
या ऑनलाइन कार्यक्रम मध्ये खासदार सुभाष भामरे,
आमदार फारूक शाह रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक आर.के.शर्मा, मंडल सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, स्टेशन कर्मचारी, आर.पी.एफ कर्मचारी उपस्थित होते.
प्रारभी वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करून परिचय करून देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगान करुन राष्ट्रध्दीला सलामी देण्यात आली. धन्यवाद आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक के युवराज पाटील यांच्या कडून करण्यात आले .



