भुसावळ (प्रतिनिधी )-
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाचा राजीनामा देऊन नुकतेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात गेले.
रविवारी मुक्ताई नगर मध्ये त्यांचे स्वागत भुसावळच्या माजी नगरसेवीका व राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा नंन्दा निकम व प्रकाश निकम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे स्वागत केले.
नंन्दा निकम यांनी महीलांवर होणारे अन्याय व भुसावळ शहरातील गुंडगिरी वर आळा बसवण्यासाठी तसेच थांबलेले विकासकामे ताबरतोब पुर्ण व्हावे या बद्दल खडसे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्या सोबत प्रकाश निकम व कार्यकर्ते उपस्थित होते.



