भुसावळात दुर्गा विसर्जन शांततेत ; कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला नाकारली परवानगी : पोलिसांचा चोख बंदोबस्त


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनामुळे दुर्गा विसर्जन मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे वाहनावरून थेट तापी नदीपात्रात मूर्ती नेण्यात येवून शांततेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त राखला. यंदा मिरवणुकीला परवानगी नाकारन्यात आली होती तसेच डीजे वा वाद्य ढोल ताशे वाजविन्यास मनाई करण्यात आली होती .
पोलिसां तर्फे विसर्जन मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदीराजवळ बॅरेकेट लावून रस्ता बंद केला होता तर मशीदीकडे जाणार्‍या मार्गावर सुध्दा बॅरेकेट लावून रस्ता बंद करण्यात आला होता शहरात दुर्गा विसर्जनाच्या पार्श्वभमीवर पालिकेकडून मूर्ती संकलन केद्रांची निर्मिती करण्यात आली होती. दुर्गा विसर्जन दरम्यान अप्रिय घटना टाळण्यासाठी पट्टीच्या पोहणार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. यावल नाक्याजवळील राहुल नगरजवळून तापी नदीकडे जाणारा मार्ग पोलिसांनी बंद केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *