भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनाने भादली-जळगाव दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामाला सुरुवात केली असून 5 नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळेस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे काही मेल-एक्सप्रेस गाड्यांवर परीणाम होणार असून काही रेल्वेगाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात येणार आहेत. भादली-जळगाव दरम्यान तिसर्या लाईनवर इंटरलॉकींगचे काम केले जात असल्याने रेल्वे प्रशासनाने 28, 29, 31 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबरला सकाळी 9.10 ते 12.10 असा तीन तासांचा ब्लॉक घेतला आहे. यामुळे गाडी क्रमांक डाऊन 07379 सुरत-छपरा एक्सप्रेस शनिवारी पाळधी स्टेशनवर सकाळी 10.20 ते 12.20 वाजेपर्यंत थांबेल तसेच 02833 डाऊन अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस जळगाव स्टेशनवर 10.45 ते 12.20 या वेळेत थांबेल. डाऊन 08408 सूरत-खुर्दारोड शनिवारी पाळधी स्टेशन वर 10.40 ते 12.10 वाजेपर्यंत थांबवण्यात येईल. गाडी क्र.05068 बांद्रा – पटना डाऊन शुक्रवारी 11 ते 12.10 वाजेपर्यंत पाळधी स्टेशनवर थांबेल. गाडी क्र.02165 एलटीटी-गोरखपूर डाऊन ही सोमवारी, गुरुवारी आणि शुक्रवारी शिरसोली स्टेशनवर थांबवण्यात येणार आहे.



