रेल्वे प्रवाशांसाठी पुन्हा विशेष गाड्यांचा दिलासा ; भुसावळ विभागातील प्रवाशांना होणार सहा विशेष गाड्यांचा लाभ ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सण-उत्सवांचे दिवस पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरीक्त सहा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आरक्षित असलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार असून त्यासाठी कन्फर्म तिकीट असल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.
पुणे-गोरखपूर-पुणे विशेष गाडी डाऊन 01115 पुणे-गोरखपूर विशेष गाडी 22 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ते 26 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 4.15 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी गोरखपूरला 1.05 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 01116 गोरखपूर-पुणे विशेष गाडी 24 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 28 नोव्हेंबर 2020 दरम्यान दर शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 3.30 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी पुण्याला 4.05 वाजता पोहोचत आहे.
या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड आदी स्थानकावर तसेच नियमित गाडी पुणे-गोरखपुर-पुणे एक्स्प्रेसप्रमाणे थांबे देण्यात आले आहेत.
पुणे-लखनऊ-पुणे विशेष गाडी
डाऊन 01407 पुणे-लखनऊ विशेष गाडी 20 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ते 24 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहुन 10 वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्‍या दिवशी 2.40 वाजता मंडुआडीहला पोहोचणार आहे. अप 01408 लखनऊ-पुणे विशेष गाडी 22 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 26 नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 6.30 वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्‍या दिवशी 11.05 वाजता पुण्याला पोहोचणार आहे. पुणे-लखनऊ-पुणे एक्स्प्रेसप्रमाणे या गाडीला थांबे देण्यात आले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस- मंडुआडीह-लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष गाडी
डाऊन 02167 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंडुआडीह विशेष गाडी 19 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ते 30 नोव्हेंबरदरम्यान दर सोमवार व शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहुन 12.35 वाजता प्रस्थान सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 4.25 वाजता मंडुआडीहला वाजता पोहोचेणार आहे. अप 02168 मंडुआडीह-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर दरम्यान मंगळवारी व शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 9.50 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्‍या दिवशी 12.25 वाजता लोकमान्य तिलक टर्मिनसला पोहचेल. या गाडीला खंडवा, भुसावळ, नाशिक तसेच गाडी क्रमांक 12167/12168 लोकमान्य टिळक टर्मिनस-मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसप्रमाणे थांबे देण्यात आले आहेत.
पुणे- मंडुआडीह-पुणे विशेष गाडी डाऊन 02135 पुणे-मंडुआडीह विशेष गाडी 19 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 24 नोव्हेंबर दरम्यान दर सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 4.15 वाजता प्रस्थान करणार असून दुसर्‍या दिवशी 7.20 वाजता मंडुआडीहला पोहोचणार आहे. अप 02136 मंडुआडीह-पुणे विशेष गाडी 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर दरम्यान दर बुधवारी प्रस्थान स्थानकावरून 4.10 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 8.05 वाजता पुण्यात पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, मनमाड तसेच नियमित गाडी क्रमांक 22131/22132 पुणे – मंडुआडीह-पुणे एक्स्प्रेस प्रमाणे थांबा देण्यात आला आहे.
पुणे-दरभंगा-पुणे विशेष गाडी
डाऊन 01033 पुणे-दरभंगा विशेष गाडी 21 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 25 नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहुन 4.15 वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्‍या दिवशी 6.50 वाजता दरभंगा येथे पोहोचणार आहे. अप 01034 दरभंगा-पुणे गाडी 21 ऑक्टोबपासून सुरू झाली असून ती 25 नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहुन 4.45 वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्‍या दिवशी 08.05 वाजता दरभंगा येथे पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ व मनमाड तसेच नियमित गाडी क्रमांक 11034/11033 पुणे-दरभंगा-पुणे प्रमाणे थांबे देण्यात आले आहेत.
हटीया-लोकमान्य टिळक-टर्मिनस-हटिया एक्स्प्रेस
अप 02812 हटीया-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 23 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 27 नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहुन 9.40 वाजता प्रस्थान करेल आणि लोकमान्य तिलक टर्मिनसला दुसर्‍या दिवशी 1.35 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02811 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया विशेष गाडी 25 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 29 नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन रात्री 12.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी हटीयाला चार वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला असून या गाडीला नियमित गाडी क्रमांक 12812/12811 हटीया-लोकमान्य टिळक टर्मिनस-हटीया एक्स्प्रेसप्रमाणे थांबा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *