अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३२ वर्षीय शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल ;


यावल ( प्रतिनिधी ) –
शहरातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका ३२ वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ही घटना दि. २० /१० / २०२० मंगळवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली सदर मुलगी शिकवणी वरून घरी गेल्यानंतर तिने आपल्या पालकांना हा विषय सांगितला याप्रकरणी पोलिसात त्या ३२ वर्षीय शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरातील आयेशा नगर भागात सईद बेग गुलाब बेग मिर्झा वय ३२ रा. डांगपुरा यावल हा खाजगी शिकवणी घेतो. दि. २० /१० / २०२० मंगळवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेमध्ये तो शिकवणी घेत असताना त्याने सर्व मुलांना सुट्टी दिली व सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेला थांबवून ठेवलं. सदर मुलगी घरी का आली नाही याची माहिती घेण्याकरिता सदर मुलीच्या आईने तिच्या अल्पवयीन भावास शोध घेण्यासाठी पाठवले असता सदर शिक्षक हा त्या मुली सोबत अश्लील चाळे करत असताना दिसून आला. तेव्हा त्या मुलीला घेऊन त्या मुलीचा लहान भाऊ हा घरी पोहोचला घरी पोहोचल्यावर मुलीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली तेव्हा संतप्त झालेल्या पालकांनी व जमावाने शिक्षकाला चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार सईद बेग गुलाब बेग मिर्झा यांच्या विरुद्ध पोलिसात पोस्को कायदा अन्वय बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *