भादली रेल्वे गेट २१ रोजी बंद
भुसावळ (प्रतिनिधी )-
अभियांत्रिकी विभागाकडून देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी भादली-जळगाव दरम्यान असलेले रेल्वे गेट क्रमांक १४९ (लेव्हल क्रासिंग गेट) हे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते रात्री ८ वाजे दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. नागरीक व वाहनधारकांनी दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



