भुसावळ (प्रतिनिधी )-
जागर प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्यावतीने नुकताच कोरोना योद्धांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. जागर प्रतिष्ठान च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, पत्रकार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, प्रशासकीय विभागाचे कर्मचारी, अधिकारी, यांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, जि प सदस्य पल्लवी सावकारे, उद्योजक व श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, सभापती मनीषा पाटील, प स सदस्या प्रीती पाटील, नगसेवक पिंटू कोठारी, पत्रकार संघाचे संजयासिंग चव्हाण, सरपंच मनीषा देशमुख, गटविकास अधिकारी विलास भाटकर, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, बि डी धाडी, किशोर वायकोळे, प स सदस्य सुनील महाजन, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील यांनी केले.
‘जागर ‘ गौरवामुळे कोरोना योद्ध्यांना मिळेल नवी ऊर्जा

आ. संजय सावकारे
समारंभाध्यक्ष आमदार संजय सावकारे यांनी सांगितले की, या महामारी च्या संक्रमण काळामध्ये शिक्षक, पोलीस, डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी व अन्य क्षेत्रातील सर्वच घटकांनी खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. जागर प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सन्मान सोहळ्यामुळे कोरणा युद्धांना एक नवी ऊर्जा व दिशा मिळेल प्रतिष्ठान ने घेतलेली दखल कौतुकास पात्र असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले.
कोरोना योद्धांचे कार्य देव दूता प्रमाणे- खा रक्षाताई खडसे
समारंभाच्या प्रमुख अतिथी खासदार रक्षाताई खडसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कोरोना काळात सर्वच आपला जीव मुठीत घेऊन थांबले होते. परंतु, या काळात प्रशासकीय शेत्रातील कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी व पोलिस या सर्वांनी केलेले कार्य अतुल्य आहे . कोसळलेल्या कोरोना रुपी महामारी ने चिंताग्रस्त असलेल्या जगाला भयमुक्त केले आहे ते केवळ आणि केवळ कोरोना योद्धा म्हणून कार्यरत माणुसकीने मूळे. त्यामुळे याचे कार्य जणू देव दुता समान असल्याचे प्रतिपादन खा. खडसे यांनी केले.
कोरोना महामारीतून मुक्ती करिता मास्क आणि सॅनिटायझर चा वापर आवश्यक
उद्योजक श्रीराम पाटील
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व जळगाव येथील साईराम ड्रिप इरिगेशन चे सर्वेसर्वा उद्योजक श्रीराम पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, कोरोना महामारीची भीती खूप मोठी होती. परंतु या आजाराला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी मास्क आणि सैनी टायझर वापर अवश्य करावा. तसेच आपण शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केल्यास लकरच महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल. असे श्रीराम पाटील यांनी प्रतिपादन केले.
नगरसेवक पिंटू कोठारी यांचा गौरव
कोरोना काळात अन्नदान करणे, रुग्णांस अँडमिट करणे, प्रसंगी आर्थिक मदत, वेळ पडल्यास अत्याविधी करणारे व जवळपास 1100 कोरोना रुग्णांना home Quarantine करण्यास मदत करणारे नगरसेवक पिंटू कोठारी यांचा देखील या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
बीट स्तरीय नियोजनात करणार 700 शिक्षक कोरोना योद्धांचा सन्मान
कोरोना महामारी च्या काळात शिक्षकांनी माझे कुटुंब, स्वस्त कुटुंब अभियानात अत्यंत प्रामाणिकपणे कामगिरी निभावत कोरोना संक्रमणाचा वेग कमी केला आहे. याची दखल घेऊन पंचायत समिती शिक्षण विभाग व जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातशे कोरणा युद्धांचा गौरव बीट प्रमाणे केला जाईल.
प्रा पंकज पाटील
सोहळ्याचे सूत्रसंचालन राहुल भारंबे तर आभार संजय भटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे राजू फेगडे, प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनवणे, कोषाध्यक्ष ऋषिकेश पवार, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, सचिव प्रा निलेश गुरुचल, , जागर मित्र व तंत्रस्नेही योगेश इंगळे, सुनील वानखेडे, समाधान जाधव, कायदेशीर सल्लागार हरीश पाटील, गोकुळ सोनवणे, पवन पाटील, जीवन महाजन, दीपक राजपूत, अमित चौधरी व जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.


