भुसावळ (प्रतिनिधी )-
आई रागवल्याचा राग आलेल्या लहान मुलास अवघ्या दीड तासात बाजारपेठ पोलिसांनी
शोधून आईघ्या ताब्यात दिल्याने ख़ाकीमधील माणुसकी अद्यापही जिवंत असल्याची जाणीव भुसावळकरांना झाली आहे .
शहरातील पाटील मळा,आनंदराव कॉलनी भागातील रहिवाशी विशाल समाधान इंगळे वय ३५ एच.डी.एफ.सी.बँक पुणे येथे नोकरी करीत असून त्यांचा १२ वर्षिय मुलगा वृषभ विशाल इंगळे ( शिक्षण ६ वी ) यास ताप्ती पब्लिक स्कुल मधील शिक्षिका म्हणून कार्यरत त्याची
आई सौ कविता इंगळे यांनी अभ्यासाचे कारणावरुन रागवल्याचा राग आला व विशाल रविवारी सकाळी ६.३० वाजेपासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेला होता.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला मुलाच्या आई-वडिलांच्या धाव घेऊन झालेल्या घटनेबद्दल माहिती पोलीस स्टेशनला दिली.
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोर,पोना दीपक कापडणे, नेव्हील बाटली,रमण सुरळकर,महिला पोकॉ प्रिया आरखराव यांनी कार्यतत्परता दाखवीत शहरात सर्वत्र शोध घेऊन अवघ्या दीड तासात मुलाचा शोध लावून आई-वडिलांच्या ताब्यात दिले. मुलाला बघून आनंदित झालेल्या आईसह परिवार व नागरिकांनी पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीचे कौतुक केले .



