एक वर्षांपासून फरार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळयात ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
बाजारपेठ पोलीस स्टेशनला सप्टेंबर २०१९ पासून
गुन्हा दाखल गुह्यातील अट्टल फरार आरोपी शहरात आल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षकांना मिळल्यावरून पोलिस पथकाने घटनास्थळी पोहचून आरोपीस अलगद जाळयात अडकविले .
याबाबत अधिक असे क़ी शहरातील पंधरा बंगला प्रल्हाद नगर भागातील रहिवाशी सागर उर्फ शिवा ग्यानसिंग भोसले यांच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशनला सप्टेंबर २०१९ पासून भाग ५ गुरन ४४४/२०२० भादवी कलम ३२४, १४३, १४७,१४९, ३२३,५०४,५०६ ,३४ नुसार गुन्हा दाखल होता मात्र गुन्हा घडल्यापासुन तब्बल 1 वर्षे पासून आरोपी सागर उर्फ शिवा ग्यानसिंग भोसले वय ,२४ रा.१५ बंगला प्रल्हाद नगर भुसावळ हा फरार होता.
दरम्यान भुसावळ शहरात प्रल्हाद नगर भागात आरोपी आला असल्याची माहीती
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त बातमीदारा कडुन मिळाल्याने सहा.पो.निरीक्षक मंगेश गोटला, सहा पो.निरीक्षक अनिल मोरे ,पो.काॅ गजानन वाघ,सुभाष साबळे,योगेश महाजन अशांना लागलीच रवाना करुन आरोपीस भुसावळ शहरातील रिंग रोड प्रल्हाद नगर भागातून ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *