घटस्थापना व विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यातील कत्तलखाने व बीफ मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश


जळगाव –
जिल्ह्यात नवरात्र-दुर्गोत्सव १७ ऑक्टोबरपासून सुरु होत असून उत्सव धार्मिक स्वरुपाचा असल्याने या कालावधीत कत्तलखाने व बीफ मार्केट बंद ठेवण्याबाबत पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यानुसार शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी व सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२० रोजी विसर्जनाच्या दिवशी संपुर्ण जिल्ह्यातील कत्तलखाने, बिफ मार्केट व मटन मार्केट बंद ठेवणेबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी सर्व संबंधितांना पत्रान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *