राजू सूर्यवंशीवर कारवाई करावी – नंदा निकम यांचे प्रांतांना निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील १५ बंगला भागातील राजू भागवत सूर्यवंशी हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्यांच्यावर भुसावळ शहर, जळगांव जिल्ह्यात तसेच अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असून कोर्टात सुद्धा बरेच गुन्हे दाखल आहेत. सदर व्यक्ती हा सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना धमक्या देणे ,शिवीगाळ करणे , ब्लॅकमेल करणे ,
खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा धमक्या देणे इत्यादी प्रकार खुलेआम करीत आहेत.
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या विरुद्ध बदलीचे षड्यंत्र सूर्यवंशी हे करीत असून पत्रकार परिषद घेऊन त्यांचे विरुद्ध राजू सूर्यवंशी हा खोटे व निराधार आरोप करीत आहेत .
अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षा नंदा निकम यांनी प्रांत अधिकारी यांना दिले आहे . कार्यालयाकडे तक्रार दाखल करून त्यांचे कारनामे उघड करीत असल्याने तक्रारदार यांच्या परिवाराला सदर व्यक्तीपासून जीवाला धोका असून जर माझ्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीचे कमी जास्त झाल्यास त्यास राजू भागवत सूर्यवंशी जबाबदार राहील.यांची प्रशासनाने नोंद घ्यावी असा स्पष्ट इशारा दिला आहे .
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत चांगले काम करीत असून त्यांनी १५ बंगला भागातील अवैध धंदे विरुद्ध त्यांनी कडक कारवाई केली आहे.तरी सदर राजू भागवत सूर्यवंशी हा व्यक्ती चांगल्या व कार्यदक्ष सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणून त्यांना अचडणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी याबाबत दिनांक १२/१०/२०२० रोजी प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्ष नंदाताई निकम,प्रकाश निकम व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *