पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी तत्काळ द्यावा- दिपक धांडे ; अन्यथा खासदार खडसें यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा इशारा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी तात्काळ द्यावा अशी मागणी दिपक धांडे यांनी निवेदानाद्वारे केली असून निधी तात्काळ न मिळाल्यास अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आपल्या मुक्ताई नगर येथील संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ् असा इशारा दिला आहे .
लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे रावेर यांनी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी तत्काळ द्यावा अशी मागणी
केली असून याबाबत
याआधी दिनांक ४ सप्टेंबर २०२० रोजी पत्र दिले होते .
सर्व लाभार्थी मुक्ताईनगर येथे आपल्या संपर्क कार्यालय येथे येऊन आंपल्याला पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी मिळावा यासाठी निवेदन दिले होते व आपण त्या वेळेस नगर पालिका प्रशासाकडून पत्र पाठवा असे सागितले होते व त्या प्रमाणे भुसावळ मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून लगेच आपणास मुख्याधिकारी यांच्या सहीनिशी पत्र पाठवलेले होते
परंतु तब्बल दीड महिना उलटून सुध्दा आपण केंद्र शासनाचा निधी आज पावेतो भुसावळ नगर पालिकेला प्राप्त झालेला नाही आणि त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात केंद्र शासनाचा प्रति चीड निर्माण होत आहे
तसेच सर्व लाभार्थी गेल्या १० महिन्या पासून भाड्याच्या घरात राहत असून गेल्या १० महिन्या पासून ५ हजार प्रती महिन्या प्रमाणे ५० हजार रु आज पावेतो लाभार्थ्यांचे फक्त भाड्या पोटी खर्च झालेले आहे आधीच कोरोना सारख्या महामारी मध्ये काम धंदे नाही त्यातच घर भाडे भरून लाभार्थ्यांना आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की घर भाडे भरायचे हा मोठा प्रश्न लाभार्थ्यांना पडलेला आहे त्यामुळे आपण ह्या स्मरण पत्राचा गांभीर्य पूर्वक विचार करून लवकरात लवकर पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी मिळून द्यावा , अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आपल्या मुक्ताई नगर येथील संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *