;
भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील कन्हाळा बु.॥ शिवारातील मोतीराम नगरात सुरु असलेल्या जुगाराच्या डावावर तालुका पोलिसांनी धाड टाकत पाच जुगार्यांच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून बावन्न पत्त्यांचा कॅट तसेच एक हजार ७५० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी योगेश सुभाष चव्हाण, शांताराम धोंडीराम जाधव, शंकर भगवान महाजन, सुकलाल काशीराम सपकाळे, संजय राजधार कोचुरे (रा.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार विठ्ठल फुसे, जगदीश भोई , प्रवीण पाटील, होमगार्ड कमलाकर महाजन आदींच्या पथकाने केली.



