प्रतिनिधी भुसावळ
जळगाव जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी पदी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार व शिक्षण विस्तार अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद चे राज्याध्यक्ष राजेंद्र सपकाळे यांची नियुक्ती झाल्याने शिक्षकांकडून त्यांचा गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे शिक्षकांच्या येणाऱ्या समस्या सोडवून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर भर असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
या गौरवासाठी गस सोसायटीचे तज्ञ माजी संचालक योगेश इंगळे , खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव जीवन महाजन , जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव तथा एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट महाराष्ट्र चे संचालक सुनील वानखेडे, यावल येथील शिक्षक भारतीचे अध्यक्ष नितीन साठे तंत्रस्नेही शिक्षक संदीप पाटील, जुनी पेन्शन हक्क संघटना जळगाव चे जिल्हाध्यक्ष गोविंदा ठाकरे पाटील , नूतन प्राथमिक शिक्षक सोसायटी भुसावळ चे संचालक प्रदीप सोनवणे आदी उपस्थित होते



