वरणगावात आज आरोग्य निदान शिबिर ;


वरणगाव( प्रतिनिधी )- मंगळवार सकाळी दहा वाजता लहान मुले महिला यांचे आरोग्य शिबिर तसेच मूळव्याध व व्यसनमुक्ती यावर सल्ला देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने एक दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे
बस स्थानक चौकातील गणपती हॉस्पिटल मध्ये मंगळवारी सकाळी दहा वाजता भुसावळ येथील किलबिल हॉस्पिटल चे बालरोग तज्ञ प्रहिज फालक हे लहान मुलांच्या विविध आजारांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे महिला आरोग्य निदान व व्यसनमुक्ती याबाबत भुसावळ येथील अध्ययन पॅरामेडिकल हॉस्पिटल व कॉलेज चे संचालक डॉ वंदना वाघचौरे या मार्गदर्शन करणार असून या शिबिरात गणपती हॉस्पिटल चे डॉ पी व्ही पाटील मदत करणार आहे वरणगाव शहर परिसरातील गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे वरणगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर प्रोजेक्ट चेअरमन विकास पाचपांडे सुनील वानखेडे जीवन महाजन योगेश इंगळे प्रदीप सोनवणे समाधान जाधव बापू चौधरी राजेंद्र परसे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे या शिबिराच्या नियोजनासाठी गणपती हॉस्पिटल येथे बैठक झाली या बैठकीवेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून योग्य त्या खबरदारी घेण्यासाठी चर्चा करण्यात आली या शिबिराचा लाभ गरजूंना घ्यावा अशा प्रकारचे आवाहन आयोजकांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *