भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घंटानाद आंदोलन.


भुसावळ (प्रतिनिधीं )-
मंदिरे सुरू करा या मागणी करता
भुसावळ तालुक्यातील साकरी येथे आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी घंटानाद आंदोलन करण्यात आले .
महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्ण यापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला इशारा देण्यासाठी शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११वाजता राज्यभर अध्यात्मिक समन्वय आघाडी आंदोलनात अखिल भारतीय वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष गुरुवर्य ह भ प प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुक्यातील साकरी येथे अ.भा.वा.मं तालुका उपाध्यक्ष ह. भ.प. दत्तात्रय महाराज साखरीकर (आळंदी देवाची)
अ.भा.वा.मं.राज्य सदस्य ह.भ.प. चंद्रकांत महाराज साखरी विठ्ठल मंदिराचे चेअरमन नथू वारके , मंदिर विश्वस्त पंकज भारंबे, लक्ष्मण चोपडे ,गोविंद भारंबे, देविदास तळेले, चंद्रकांत फालक, यांच्या उपस्थितीत पार पडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *