भुसावळात पोलीसांचे भर पावसाळ्‍यात जोरदार शक्‍तीप्रदर्शन.


भुसावळ (प्रतिनिधी )-
आगामी गणेश विसर्जन व मोहरमच्‍या पाश्वभुमीवर आज दि.२९ आॅगस्‍ट शनिवार रोजी पोलीसांनी पोलीस पथकासह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मैदान पर्यंत पथसंचलन केले. शहरातील माॅडर्न रोड,गांधी चौक,सराफ बाजार,डेली मार्केट,जामनेर रोड,सातारा,दशमेश मार्ग जळगाव रोड आदी भागात जोरदार पथसंचलन करुन शक्‍ती प्रदर्शन करीत समारोप झाला. यात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे,तालुक्‍याचे रामकृष्‍ण कुंभार आदी सहभागी होते.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड म्‍हणाले कि,आगामी सणांसाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा शहरात तैनात आहे.नियमांचा व कायद्‍याचा भंग केल्‍यास निश्‍चितच कारवाई केली जाईल. नागरिकांच्‍या सुरक्षिततेसाठी शासन,प्रशासन व पोलीस यंत्रणा दिवसरात्र सज्ज असल्याचे राठोड यांनी स्‍पष्‍ट केले.या पथकात बाजारपेठ,शहर व तालुका पोलीस ठाण्‍याचे अधिकारी,कर्मचारी, नियंत्रण कक्षातील कर्मचारी,रॅपीड अॅक्‍शन फोर्स प्लाटूनचे पथक सहभागी होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *