शहरात दिड दिवसाचे गणपती विसर्जनासाठी दोन ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्राची स्थापना ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड १९ या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी गणशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा तसेच यानुसार गर्दी होवु नये म्हणुन यावर्षी सार्वजनिक ठिकाणी तापी नदीवर श्रीगणेशाचे विसर्जन करता येणार नसल्याने सर्व भक्तांनी मुर्तिसंकलन केंद्रावर
मूर्ती विसर्जनास द्यावी . असे आवाहन स्थानिक नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या मदतीने करण्यात आले आहे .
दिड दिवसाचे गणपती विसर्जनासाठी शहरात दोन ठिकाणी गणेश मुर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आले आहे .
गणेशभक्तांनी खाजगी व घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन जागेवर आपले घरीच करावे हे शक्य नसल्यास स्थानिक
द.शि, विद्यालय, यावल रोड,व म्युनिसीपल हायस्कुल, जामनेर रोड या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनास देवून पालिका प्रशासनास सहकार्य करावे ,
या मूर्तीचे संकलन केंद्रावर विधीवत पूजन करून श्री विसर्जन करण्यात येईल असे आवाहन भुसावळ नगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .
कोविड १९ या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी गणशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा असे
शासनाचे निर्देश आहेत.शासनाचे निर्देशानुसार गर्दी होवु नये म्हणुन यावर्षी सार्वजनिक ठिकाणी तापी नदीवर श्रीगणेशाचे विसर्जन करता येणार नसल्याने सर्व
मुर्तिसंकलन केंद्रावर पुजारी(ब्राम्हण ) नेमण्यात आले असुन विधीवत पुजा करुन सदर मुर्ती संकलन कराव्या. नागरीकांनी व मंडळाचे पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी यावर्षी तापीनदीवर गणेश विसर्जन पॉईन्ट ठेवण्यात आलेले नाही.तरी तापी नदीवरील विसर्जनास प्रशासना मार्फत त्या दिवशी सक्त मनाई करण्यात
आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *