कॅमेरा पुजनाने जागतीक छायाचित्र दिन साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाची महामारी पाहता भुसावळातील सिनियर फोटोग्राफर बांधवांनी मिळून सोशल डिस्टन पाळत घरीच कॅमेरा पुजन केले.
भुसावळ येथे गणेश पुरी मधील नरसिंग राठोड यांच्या घरी शहरातील सिनियर फोटोग्राफर्स तफै फोटोग्राफर नरसिंग राठोड यांनी कॅमेरा पुजन केले. प्रास्थावीक रेल्वे स्कुलचे कला शिक्षक राजेंद्र जावळे यांनी फोटोग्राफी वर आधारित कवीता सादर करुण केले. त्यानंतर जुन्या फोटोग्राफर्सचा सत्कार करण्यात आला.या वेळी शहरातील विवेक वणीकर, नरसिंग राठोड,राजेंद्र जावळे,अविनाश साळी,हरी बऱ्हाटे,श्याम गोविंदा,श्रीकांत पवार,गणेश राठोड,भरत शिंपी आदी उपस्थित होते.आभार प्रदर्शन अविनाश साळी यांनी केला,तर फोटोग्राफी बदद्ल मार्गदर्शन विवेक वणीकर यांनी केले, यशस्वीतेसाठी गणेश राठोड यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *