अंतर्नाद’च्या शाडूची गणेशमूर्ती बनवा ; कार्यशाळेत १४०० गणेशप्रेमींचा सहभाग ; अाकर्षक मूर्ती साकारणाऱ्या पाच स्पर्धकांना गाैरविणार ;


भुसावळ (प्रतिनिधी)-
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे झूम अॅपच्या माध्यमातून शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळा मंगळवार १८ रोजी घेण्यात अाली. त्यात विविध प्रकारची साेशल माध्यमे वापरून १४०० पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांनी सहभाग घेतला. मूर्तीकार रमाकांत भालेराव यांनी तंत्रशुद्ध शैलीत मार्गदर्शन केले.
अाॅनलाइन कार्यशाळेेचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर घुले तर सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी केले. तांत्रिक बाजू याेगेश इंगळे, अमित चाैधरी यांनी सांभाळली. १० वर्षे ते ७० वर्षे वयाेगट सहभागी झाला. रमाकांत भालेराव यांनी शाडूमातीच्या गणरायाची मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक अाॅनलाइन सादर करून संवादही साधला. अनेकांनी या कार्यशाळेचा लाभ घेत असतानाच अाकर्षक गणरायाच्या मूर्ती साकारल्या. जास्तीत जास्त गणेशभक्तांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात अाला. ज्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला त्यांनी येत्या २१ अाॅगस्टपर्यंत मूर्ती बनवतानाचा व रंगकाम झाल्यानंतरच्या मूर्तीचा एक असे दाेन फाेटाे प्रतिष्ठानच्या समन्वय समितीकडे पाठवावे, असे अावाहन करण्यात अाले अाहे. अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले, प्रकल्प समन्वयक प्रमाेद पाटील, सहसमन्वयक सचिन पाटील यांनी अायाेजन, नियाेजनाची जबाबदारी पार पाडली. उपक्रम समिती सदस्य याेगेश इंगळे, प्रदीप साेनवणे, जीवन महाजन, देव सरकटे, जीवन सपकाळे, विक्रांत चाैधरी, हरीश काेल्हे, मिलिंद काेल्हे, अमित चाैधरी, समाधान जाधव, संदीप सपकाळे, राजू वारके, भूषण झाेपे, प्रा. श्याम दुसाने यांनी परिश्रम घेतले.
उपक्रमाचे नवे व्यासपीठ-
शाडूच्या मातीपासून अाकर्षक मूर्ती साकारणाऱ्या पाच स्पर्धकांना पारिताेषिके, प्रमाणपत्र देऊन गाैरवण्यात येईल. पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा करण्याची चळवळ या माध्यमातून उभी राहील. अाॅनलाइन कार्यशाळेला जाे प्रतिसाद मिळाला ताे उत्साह वाढवणारा अाहे, असे अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले.
मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार
शाडूमातीची मूर्ती बनविण्याचा अानंद शब्दातीत असताे. या मूर्तीचे विसर्जन पाण्यात लवकर हाेते. अर्थात, उत्सवाचे पावित्र्य अबाधित राहते. मूर्तीकलेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अाॅनलाइन कार्यशाळा उपक्रम पथदर्शी ठरेल, असे गाैरवाेद्गार प्रशिक्षक रमाकांत भालेराव यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *