भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
सुरू असणार्या लॉकडाऊन
मुळे शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्याचेआवाहन डीवायएसपी गजानन राठोड यांनी केले.
स्थानिक संतोषी माता हॉल येथे मंगळवारी गणेश मंडळ पदाधिकार्यांच्या शांतता समितीची बैठक झाली . या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी जास्तीत जास्त चार फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करावी, घरगुती स्थापनेसाठी मुर्तीची उंची दोन फुटांपर्यंत असावी तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांनी १० बाय १० आकारात मंडप टाकावा, केवळ पाच जणांची उपस्थितीत आरती करावी. प्रत्येक मंडळाने वीज कंपनीकडून रितसर वीज कनेक्शन घ्यावे, मंडळाच्या स्टेजच्या मागे जुगार खेळू नये, भाविकांना दर्शनाची ऑनलाइन व्यवस्था करावी, मंडळाच्या पदाधिकार्यांचे टेम्रेचर व थर्मल ऑक्सीमीटरने तपासणी करावी.

*श्रीआगमन व विसर्जन मिरवणूक नाही*
गणेश स्थापना आणि विसर्जनाची मिरवणून काढण्यास सक्त बंदी असल्याचा इशारा त्यांनी दिला. विसर्जनासाठी तापी नदीवर कोणालाही जाता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भुसावळ नगरपालिकेतर्फे गणेशमुर्ती संकलन केंद्राची सुविधा शहरातील विविध भागात पुरवली जाणार आहे. भाविकांनी त्यांच्या गणेशमुर्ती या संकलन केंद्रावर जमा कराव्यात असे आवाहनही यावेळी डीवायएसपी राठोड यांनी केले.


